वार्षिक देणगी अहवाल
रुग्णांना प्रदान केलेले अर्थसहाय्य (वार्षिक)
नैसर्गिक आपत्ती व अनैसर्गिक मृत्यु करिता प्रदान केलेले अर्थसहाय्य (वार्षिक)
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये
मुख्यमंत्री कार्यालयाने कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांना जन माहिती अधिकारी म्हणून आणि सह संचालक (निधी व लेखा) यांना अपीलीय अधिकारी म्हणून घोषित केले आहे. आपणास विनंती आहे की आपण कृपया आपले माहितीचा अर्ज/अधिकार अपील या अधिकाऱ्यांकडे पाठवा.
उपरोक्त अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहाराकरिता पत्ता या संकेतस्थळाच्या ‘संपर्क साधा’ या विभागात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
या अधिनियमांतर्गत विवक्षित माहिती विनाविलंब उपलब्ध होण्याच्या दृष्टिने संबंधित विभागांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ‘जन माहिती’ अधिकाऱ्यांकडे थेट अर्ज सादर करावा. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती उपलब्ध होण्यासाठी याकरीता विहित नमुन्यात रुपये १०/-(दहा फक्त) इतके शुल्क पुढीलपैकी एका प्रकारे जमा करावे.
अ) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात रोखीने जमा करावे
आ) ‘कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय’ या पदनामाने काढण्यात आलेल्या व मुंबई येथे देय असलेला, रुपये १०/- इतक्या रकमेचा धनादेश/धनाकर्ष
किंवा
ई) शुल्कामधून सूट मिळण्यासाठी दारिद्रय रेषेखालील असल्याचे वैध प्रमाणपत्र जोडावे.
कार्यालयाचा पत्ता :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, : ६ वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई-४०००३२दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८