Logo
                             
मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने स्वतंत्र बँक खाते …
बचत खाते क्रमांक- 39239591720
मुंबई दि. 28: कोविड विषाणुच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक स्थळे स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व नागरिकांनी “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात आपली रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे. खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Saving Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत अनेक संस्था/व्यक्ती यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड - 19 या खात्यात भरगोस देणग्या दिल्या आहेत, तसेच देत आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार. आपण दिलेल्या देणगीची पोचपावती देण्यासाठी आपले पूर्ण नाव, बँकेचे नाव, दिनांक, रक्कम व UTR / Transaction ID याबाबींची आवश्यकता असते. कृपया सदर माहिती donationscmrf-mh@gov.in या ईमेलवर पाठवावी, अशी विनंती आहे. जेणे करुन आपणास पावती पाठवणे शक्य होईल.
Ways of Donation To Cmrf
1-:Online donation using debit card ,Credit card From Below Donate Online option
2-:RTGS,NEFT,Cheue using Bank details given on Website
3-: Now You can Also Donate Using Phonepe, Paytm,Gpay and all upi Enabled applications And using QR code Given on the Website